कराडमध्ये राष्ट्रवादीचा काँग्रेसला धक्का पाहायला मिळत आहे. माजी मंत्री, काँग्रेस नेते स्व. विलालकाका पाटील उंडाळकर यांचे पुत्र काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कराड येथे हा प्रवेश होणार आहे. यनिमित्ताने उंडाळकर जोरदार शकतीप्रदर्शन करणार आहेत. उदयासिंह पाटील उंडाळकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का बसला आहे.