लोकशाही मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र आहे. सत्तेचा गैरवापर करुन सत्ता मिळवण्याचा प्रयत्न आहे. महायुतीचा बोगस आणि भ्रष्टाचाराचा विकास या मुद्द्यावर सध्या उद्धव ठाकरेंनी भाष्य केलेलं आहे. नेमकं उद्धव ठाकरे काय म्हणाल्या जाणून घ्या.
सत्यमेव जयते, आता सत्तामेव जयते असं करण्याचा हा भाजपचा केविलवाणा प्रयत्न आहे किंवा क्रूर प्रयत्न आहे. सत्ता त्यांनी मिळवलेली आहे मत चोरी करुन किंवा ईव्हीएमच्या माध्यमातून म्हणा. त्या सत्तेचं गैरवापर करुन सत्ता मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भौगोलिक परिस्थिती पाहिली तर मुंबईची काही जागा समुद्र पातळीपेक्षा खाली आहे. तिथे आम्ही पंप लावून ते पाणी बाहेर काढतो असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आता यांनी काय केलं आहे वाटेल तिथे खोदतायेत. मेट्रोचं स्टेशन करतायेत. कालच्या पावसाळ्यामध्ये नवीन स्टेशन त्याचं अनावरण केलं आणि ४ दिवसांत ते वरळीचं तिथे पाणी तुंबलं. हा यांचा बोगस आणि पोकळ भ्रष्टाचाराचा विकास आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीका केली आहे.