विधानसभा निवडणुकीमध्ये घोटाळा झाल्याचा, ईव्हीएमचा गैरवापर झाल्याचा संशय आढाव यांनी उपस्थित केला आहे. आत्मक्लेष आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आज महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते त्यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. आंदोलनकर्ते बाबा आढाव यांची शरद पवार यांनी भेट घेतली. त्यापाठोपाठ अजित पवार ही भेटीसाठी पोहचले आहेत. यानंतर त्यांच्या भेटीला मविआ आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. यांनी भेट घेतल्यावर बाबा आढाव यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उपोषण सोडले आहे.
सत्यमेव जयते नाही तर सत्तामेव जयते- उद्धव ठाकरेंचा महायुतीला टोला
त्यावेळी उद्धव ठाकरे आपली प्रतिक्रिया दिली यावेळी बाब दुसऱ्यांदा याठिकाणी आले आहेत पहिला आले होते आणि आता दुसऱ्यांदा जे बाबा आले आहेत ती भेट आयुष्यभर लक्षात राहिल. तुमची भेट घेण हे माझ्या किती दिवस मनात सुरु होत आणि तस मी म्हणालो देखईल होतो. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, बाबा तुम्ही म्हणालात की, तुम्ही म्हातारपण स्विकारणार नाही.... आमच्यासाठी तुम्ही प्रेरणादायी आहात आणि मला असं वाटत की प्रेरणा कधीच म्हातारी होत नाही....
यावेळी बाबा आढावांना भेटण्यासाठी जिंकलेलेसुद्धा याठिकाणी येत आहेत आणि आम्ही हरलेले देखील बाबांच्या भेटीसाठी येत आहोत. "थोडक्यात या निकालावर ना हरलेल्यांचा विश्वास आहे ना जिंकलेल्यांचा" असं मिश्किल वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. जिंकले त्यांना धक्का आहे आपण जिंकलो कसं आणि आम्ही हरलो आम्हाला धक्का आहे आम्ही हरलो कसे? आता सत्यमेव जयते नाही तर सत्तामेव जयते असं झालं आहे असं महत्त्वाचं विधान उद्धव ठाकरेंनी याठिकाणी केलं आहे.