व्हिडिओ

Aditya Thackeray : उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी गेली, सरकारने करून दाखवावी, थेट इशारा

अजित पवार आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पाकडून शेतकरी, उद्योजक, व्यापाऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे. आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी केली आहे.

Published by : Team Lokshahi

अजित पवार आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अजित पवार आज आपल्या अर्थ संकल्पाच्या पेटाऱ्यातून कोणत्या नव्या घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. नवीन महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. तर अर्थमंत्री म्हणून अजित पवारांचा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज राज्याचा वर्ष 2025-26 साठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. विधानसभा निकालात महायुतीला प्रचंड यश मिळाल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. अर्थसंकल्पाकडे शेतकरी, उद्योजक, व्यापाऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी अर्थसंकल्प सादर होण्यापुर्वी आपली प्रतिक्रिया दिल्या आहेत.

प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरे म्हणाले की, "या अर्थसंकल्पाकडून जनतेला खूप अपेक्षा आहे. लाडकी बहीण योजना 1500 हजार वरुन 2100 कडे जाणार का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. भाजपने दिल्लीमध्ये जाहीर केलं होत की, 2500 रुपये महिलांना मिळत आहे. त्यामुळे दिल्लीतील आणि महाराष्ट्रातील बहिणीमध्ये काय फरक? हे अर्थसंकल्पातून आम्हाला सांगावं. मुंबईला केंद्राच्या अर्थसंकल्पामधून काहीही मिळाले नाही. राजकीय नेत्यांच्या साखर कारखान्याला देण्यासाठी हजार कोटी रुपये सरकारकडे आहेत. महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या निवडणूक झाल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद करतील. भाजपाच्या विरोधात बोलतो तो बेकायदेशीर अशी भाजपची व्याख्या आहे. महायुतीचे सरकार महाजुटीचे सरकार आहे. बोलून निवडणुका इलेक्शन कमिशनच्या आशीर्वादाने जिंकलेले महायुतीचे सरकार आहे." असे शिवसेना गटाचे ठाकरे नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात