शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 21 जानेवारीला शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती श्री शिवाजीमहाराजांच्या जन्मस्थळी भेट देणार आहेत. ठाकरे यांच्या शिवनेरी दौऱ्याला केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी अद्याप परवानगी न मिळाल्याने दौरा रद्द होणार का? अशी शंका व्यक्त केली जात आहे. शिवनेरी किल्ल्यावर हेलिपॅड तयार करण्यासाठी गेलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना अद्याप कामाला परवानगी मिळाली नाही.