पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं दिले आहेत. यामुळे पुण्याला आता त्यांचा हक्काचा खासदार मिळणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर घटनातज्ञ उल्हास बापट यांनी मोठा दावा केला आहे. पुण्याची लोकसभा पोटनिवडणूक होणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
आत्तापर्यंत निवडणूक आयोगाचे कामकाज पूर्णपणे घटनाबाह्य आहे. न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश दिले असले तरी त्यातून अनेक पळवाटा निवडणूक आयोग घेऊ शकते. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आयोग आव्हान देऊ शकेल. त्यामुळे या सगळ्यांचा कालावधी बघता तोपर्यंत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची घोषणा होईल. त्यामुळे पुण्याची लोकसभा पोटनिवडणूक घेणे शक्यच नाही, असे मत उल्हास बापट यांनी व्यक्त केले आहे.