महायुतीत आमच्यावर अन्याय होत असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलेलं आहे. मला एकट्यालाच मंत्रीपद मिळालं आहे मात्र कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आघाडीत असताना तरी जास्त जागा मिळत होत्या असं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलेलं आहे.
उलट शरद पवार-काँग्रेस आघाडीच्या काळात 3-4 मंत्री, 7-8 विधान परिषदेच्या जागा आणि मुंबईचं महापौर पद मिळाल्याचं देखील रामदास आठवले म्हणाले आहेत. महायुतीच्या काळात RPI ला सत्ता मिळत नाही, कार्यकर्त्यांना तर काहीच मिळत नाही, असं म्हणत रामदास आठवले यांनी आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.