सिंधुदुर्ग विमानतळाला टाळे ठोकून दाखवाच तुमच्या घराला टाळ ठोकल्याशिवाय राहणार नाही असा धमकीवजा इशारा खासदार नारायण राणे यांनी कणकवली येथील एका कार्यक्रमात दिली होती. यावर ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही धमक्यांना भीक घालत नाही, विरोधक म्हणून चुकीच्या गोष्टींना विरोध करत राहणार. तुम्ही त्या सुधरवायच्या आहेत. मात्र, ते तुम्ही तसे करणार नाही तुम्ही कसे निवडून आलात हे जनतेला माहित आहे. विमानतळ सुरू न झाल्यास जनतेला व शिवसैनिकांना सोबत घेऊन तारीख जाहीर करून टाळे ठोकू असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितलं. तर सी-वर्ल्ड प्रकल्प करताना जमिनी मात्र खरेदी करू नका असेही वैभव नाईक म्हणाले.