व्हिडिओ

VBA : ‘वंचित’ची पाचवी यादी जाहीर, 10 उमेदवारांची नावे जाहीर, कुणाकुणाला संधी?

Published by : Dhanshree Shintre

वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणूक 2024 साठी महाराष्ट्रातील उमेदवारांची पाचवी यादी आज जाहीर केली आहे. भाऊसाहेब आंधळकरांना धाराशिवमधून तर निलेश सांबरे यांना आता भिवंडीमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच रायगडमधून कुमूदानी चव्हाण, नंदुरबारमधून हनुमंत सूर्यवंशी, जळगावमधून प्रफुल लोढा, दिंडोरीमधून गुलाब बर्डे, पालघरमधून विजया म्हात्रे, उत्तर मुंबईमधून बीना सिंग, उत्तर पश्चिम मुंबईमधून संजीवकुमार कलकोरी, दक्षिण मुंबईमधून अब्दुल हसन खान यांना आता वंचितच्या वतीने उमेदवारी देण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीसोबत चर्चा फिस्कटल्यानंतर त्यांनी राज्यातील सर्वच मतदारसंघांवर उमेदवार उतरवणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

संजय राऊत यांच्यावर अहमदनगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

रोहित पवार यांनी ट्विट करत परळी तालुक्यात बोगस मतदान झाल्याचा केला आरोप; म्हणाले...

Uddhav Thackeray : 4 जूनला आपल्या देशातलं जुमलापर्व संपतं आहे

काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण; रोहित पवार यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

ईशान्य दिल्लीत काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण