Video Viral  team lokshahi
व्हिडिओ

Video Viral : शिक्षकाने केली विद्यार्थिनीला बेदम मारहाण, कारण...

शिक्षकाला निलंबित करण्याचे आदेश

Published by : Team Lokshahi

Video Viral : मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील ममतखेडा येथील सरकारी शाळेत शिक्षकाने विद्यार्थिनींना गणित बरोबर न केल्याने बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा शिक्षणाधिकारी केसी शर्मा यांनी शिक्षक जेके मोगरा यांना निलंबित केले आहे. याप्रकरणी विभागीय स्तरावरही तपास सुरू राहणार आहे. ममतखेडा शाळेत शिक्षक मोगरा यांनी गणित बरोबर न केल्याने वर्गातच दोन विद्यार्थिनींना बेदम मारहाण केल्याची माहिती आहे. (video viral teacher brutally slapped two girl student)

मारहाणीचे दोन व्हिडिओ व्हायरल झाले. यानंतर पालकांनीही कारवाईची मागणी केली होती. जावरा एसडीएम हिमांशू प्रजापती यांनी चौकशीचे आदेश दिले होते. पिपलोडा बीईओ शक्ती सिंह परिहार आणि बीआरसी विनोद शर्मा तपास करत आहेत. व्हायरल व्हिडिओच्या आधारे, डीईओ शर्मा यांनी रविवारी शिक्षक मोगरा यांना निलंबित करण्याचे आदेश जारी केले. अभ्यासादरम्यान मारहाण करणे कोणत्याही प्रकारे योग्य मानले जाऊ शकत नाही. व्हिडिओमध्येच सर्व काही स्पष्ट होत आहे, त्यामुळे निलंबन केले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हा प्रकार आहे

शिक्षकाने विद्यार्थिनींना बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून, सर्वप्रथम तो बोर्डासमोर उभ्या असलेल्या विद्यार्थिनीला चापट मारताना दिसत आहे. यानंतर दुसरी विद्यार्थिनी बोर्डासमोर येते आणि काहीतरी वाचण्याचा प्रयत्न करताना दिसते, ज्यामध्ये शिक्षक तिच्या डोक्यावर मागून मारतो आणि नंतर पुन्हा मुस्काडीत मारतो.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा