महायुतीचं जागावाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना 100 जागांसाठी आग्रही आहे. तर राष्ट्रवादीच्या वतीनं देखील सन्मानजनक जागा लढवण्याची तयारी सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभेची जागानिहाय चर्चा लवकरच सुरु होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. महायुती विधानसभा एकत्र लढवण्यावरती ठाम असल्याचं देखील पाहायला मिळत आहे.