राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी वडेट्टीवारांनी पवारांची भेट घेतली आहे. यासंबधी माध्यमांपुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, बारामतीला मी व्हॉइस ऑफ मीडियाच्या कार्यक्रमाला आलो आहे. सोबतच पवार साहेबांना भेटलो, ही एक सदिच्छा भेट होती. भेटीदरम्यान राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. काय चर्चा झाली हे माध्यमांपुढे उघड करणे म्हणजे आमच्या आपापसात भंग होईल, असे वडेट्टीवार म्हणाले आहेत. यासोबतच वडेट्टीवारांनी अनेक विषयांवर चर्चा केली.