व्हिडिओ

Vijay Wadettiwar on Mahayuti : 'भ्रष्टाचाराने माखलेले हे भ्रष्टाचारी' वडेट्टीवारांची महायुतीवर टीका

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेवरून खासदार संजय राऊतांनी हल्लाबोल केला. यावर विजय वडेट्टीवार म्हणाले की,

Published by : Team Lokshahi

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेवरून खासदार संजय राऊतांनी हल्लाबोल केला. भाजपमधील बोगस शिवप्रेमींच काय मत आहे? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. लाडक्या उद्योगपतींकडून महाराजांचा अपमान केला गेला असं म्हणत संजय राऊत यांनी अदानींवर निशाणा साधला. महायुतीला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम नाही ते महाराजांचा फोटो बाजूला काढून अदानींचा फोटो लावतील असं देखील संजय राऊत म्हणाले होते.

तसेच यावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, भ्रष्टाचाराने माखलेले हे भ्रष्टाचारी मोठ्यांचे साथीदार आणि गरिबांना बनवणारं हे सरकार म्हणून सरकारच्या इतिहासात यांची नोंद होईल. खरं आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच नाव त्या विमानतळाला दिलं गेलं. त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून नामकरण केलं गेलं त्याचा मला ही आनंद झाला होता. परंतू त्यानंतर मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गायब झाला आणि जो होता तो ही हलवला आणि त्याजागी आता फोटो लावून ठेवावा लागत आहे. त्यामुळे यांच्या कडून आणखी काय अपेक्षा नाही ठेवू शकत. हे लोकं महाराजांच्या नावावर दिखावूपणा करत आहेत आणि मत मिळवण्याचा प्रयत्न करतं आहेत, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा