व्हिडिओ

Vijay Wadettiwar On Senate Election Result : युवांचा मविआच्या बाजूनं कौल

आदित्य ठाकरे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. सिनेट निवडणूकीतील दणदणीत विजयानंतर आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे.

Published by : Team Lokshahi

आदित्य ठाकरे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. सिनेट निवडणूकीतील दणदणीत विजयानंतर आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे. सिनेट निवडणूकीतील विजयामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेत चांगलाच जल्लोष पाहायला मिळत आहे. मातोश्री आणि सेनाभवन परिसरात मोठा जल्लोष देखील पाहायला केला जाणार आहे. यासगळ्या संदर्भात आता राजकीयवर्तूळातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

याचपार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार म्हणाले की, मविआच्या बाजूनं कौल आहे. युवक जे होते त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये काही संर्महम होते. पण मुंबईच्या विद्यापिठाच्या निकालानंतर युवकसुद्धा आता मविआच्या बरोबर आहेत. तर ही विजयांची परंपरा जी आहे ती कायम ठेवण्याचं काम महाराष्ट्रातील सर्व जनतेनी यांनी हा निर्धार केला आहे हे यावरून समजत आहे.

तसेच संजय राऊत म्हाणाले की, 10 पैकी 10 जागा जिंकून या मुंबईतला तरुणवर्ग, सुशिक्षित पदवीधर हे शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मागे आहेत म्हणजेच शिवसेनेच्या मागे उभा आहे हे चित्र काल स्पष्ट झालं आहे, मुंबई विद्यापिठावर भगवा फडकलेला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा