देशामध्ये लोकसभा निवडणूक मतदान 7 टप्प्यामध्ये होत असून यातील 2 टप्पे पार पडले आहेत. आज म्हणजे 7 मे रोजी याचा तिसरा टप्पा आहे. आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. माढ्यात आचारसंहितेचा भंग झाल्याचे दिसतंय. मतदान केंद्रात मोबाईल कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला आहे.
विशेष्ट उमेदवाराला मतदान करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आणि त्यानंतर येथे आचारसंहितेचा भंग केला जात आहे. असे प्रकार दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा झाल्याची माहिती समोर आलेली होती. असे आचारसंहितेचा भंग हे प्रकार समोर येत असताना निवडणूक आयोग नेमकं काय करणार, कशा पद्धतीने हा प्रकार थांबवणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. निवडणूक आयोगासमोर हे आव्हान आहे. कारण मतदान केंद्रामध्ये निवडणूक अधिकारी असतात तरीसुद्धा हे लोक मोबाईल घेऊन जातात आणि हा व्हिडिओ कसा व्हायरल होतो असा सवाल उपस्थित होत आहे.