Shocking Video | viral video team lokshahi
व्हिडिओ

Shocking Video : कुत्रं भुंकल्यामुळं मालकावर लोखंडी रॉडने हल्ला

या व्हिडीओबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा

Published by : Shubham Tate

Shocking Video : सोशल मीडियावर एक अतिशय धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये पाळीव कुत्रा भुंकतो तेव्हा शेजारी आपला संयम गमावतो आणि नंतर रागाने कुत्र्याच्या मालकाला लोखंडी रॉडने मारहाण करतो. (viral video shows man attacked dog owner after dog barked in paschim vihar delhi see how netizens reacts)

या हल्ल्यात कुटुंबातील तीन जण जखमी झाले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत आहे. ही धक्कादायक घटना दिल्लीच्या पश्चिम विहारमधील आहे, कुत्र्याच्या भुंकल्याने संतप्त झालेल्या एका व्यक्तीने मालक आणि कुत्र्याला रॉडने मारहाण करून जखमी केले. 3 मिनिटे 32 सेकंदांच्या या व्हिडीओबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

तुमच्या लक्षात आले असेल की पाळीव कुत्र्यांमुळे शेजाऱ्यांमध्ये अनेकदा भांडणे होतात. काही वेळा हे प्रकरण शिवीगाळ करण्यापासून मारहाणीपर्यंत वाढते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आलं आहे. ज्यामध्ये कुत्रा भुंकल्यावर एक व्यक्ती इतका चिडतो की तो लोखंडी रॉड घेऊन कुत्र्याला आणि त्याच्या मालकाला मारायला धावतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लाल टी-शर्ट घातलेल्या शेजारी कुत्र्याला लोखंडी रॉडने मारायचे आहे. त्यानंतर कुत्र्याचा मालक आणि त्याची पत्नी शेजाऱ्याला रोखण्याचा प्रयत्न करतात. यादरम्यान कुत्रा शेजाऱ्याच्या पायावर हल्ला करताना दिसत आहे. यामध्ये शेजाऱ्याने त्याच्या डोक्यावर वार केले आणि कुत्रा जमिनीवर झोपला. यानंतर तो कुत्र्याच्या मालकावरही हल्ला करतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा तांडव ; ढगफुटीमुळे 69 मृत्यू, 400 कोटींचं नुकसान

Amit Shah Pune : "बाजीराव पेशवेंनी 40 वर्षाच्या आयुष्यात..." पुण्यात शाहांकडून पेशवांच्या शौर्यावर भाष्य

Home Loan Intrest Rate : गृहकर्जदारांना दिलासा ! PNB, Indian Bank आणि Bank Of India ने केली व्याजदरात कपात

Latest Marathi News Update live : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश