विरारमध्ये कर्जबाजारीपणामुळे निराश झालेल्या एका इसमाने स्वत:ला पेटवून आत्महत्या केली. त्याला वाचवायला गेलेली पत्नी आणि भाचा गंभीर जखमी झाले आहेत. विरार पूर्वेच्या फुलपाडा येथील मामा नगर परिसरात अरुणदिप प्लाझा ही इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर अखिलेश विश्वकर्मा (३६) हा पत्नी आणि मुलांसह राहतो.
नेमकं काय घडलं?
शनिवारी मध्यरात्री त्याने बेडरूममध्ये स्वत:ला पेटवून घेतले. आगीचे लोट पाहताच त्याची पत्नी सुषमा विश्वकर्मा (३२) आणि भाचा लक्ष्मिकांत विश्वकर्मा (३०) वाचवायला गेले. तेथील रहिवाशांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.
या आगीत अखिलेश विश्वकर्मा याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात गंभीर जखमी झालेल्या पत्नी सुषमा किरकोळ जखमी झाला. भाचा लक्ष्मीकांता हा गंभीर भाजला असून त्याला उपचारासाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कर्जबाजारीपणामुळे त्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याने नेमकी कशी आग लावली त्याचा तपास सुरू आहे अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लालू तुरे यांनी दिली.
कर्जबाजारीपणामुळे व्यक्तीने मध्यरात्री स्वतःला पेटवून घेतले
पत्नी आणि भाचा वाचवण्यासाठी पुढे येताच गंभीर जखमी
अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली
पोलिसांच्या मते आर्थिक ताणामुळे आत्महत्या; तपास सुरू