Virat kohli  Team Lokshahi
व्हिडिओ

Asia Cup 2022 : पाकिस्तान सोबतचा सामन्याआधी विराट कोहलीची जबरदस्त तयारी; पाहा व्हिडीओ

28 ऑगस्टला होणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध महामुकाबल्यासाठी विराटची कसून तयारी

Published by : Sagar Pradhan

28 ऑगस्टपासून आशिया कपला सुरवात होणार आहे. भारत आणि पाकिस्तान मध्ये पहिला हाय होल्टेज सामना होणार आहे. या सामन्यापासूनच या कपची सुरवात होणार आहे. मात्र, भारतीय चाहत्यांचे लक्ष विराट कोहली वर असणार आहेत. कारण तो मागील बऱ्याच काळापासून तो खास फॉर्ममध्ये नाही, त्यात आता तो विश्रांतीनंतर संघात परतत असून पाकिस्तानविरुद्ध त्याचा रेकॉर्डही जबरदस्त आहे. त्यामुळेच सर्वांच्या नजरा त्याच्यावर टिकून आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय चाहत्यांना त्याला आनंदी करण्यासाठी महत्वाचा क्षण आहे. यामुळे विराटही सामन्यांपूर्वी कसून सराव करताना दिसत आहे. तो भारताचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर धमाकेदार फलंदाजी करत असल्याचं एका व्हिडीओतून समोर आलं आहे.

विराटचे शेवटच शतक

विराट कोहलीला जवळपास तीन वर्षांपासून खराब फॉर्ममध्ये आहे, त्याचा सोबत त्याचे चाहते आणि भारतीय क्रिकेट प्रेमी प्रचंड नाराज आहे. या तीन वर्षात विराटने एकही शतक केले नाही. कोहलीनं नोव्हेंबर 2019 मध्ये बांग्लादेशविरुद्ध खेळण्यात आलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात शेवटचं शतक झळकावलं होतं.

विराटची आतापर्यंतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

विराट कोहलीने आतापर्यंत 102 कसोटीत 8 हजार74 धावा आणि 262 एकदिवसीय सामन्यांमध्ये 12 हजार 344 धावा केल्या आहेत. तर, 99 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3 हजार 308 धावा केल्या आहेत. विराट कोहलीनं कसोटीत 254 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. तर एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 183 इतकी आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्याला अद्याप शतक झळकावता आलं नाही. महत्वाचे म्हणजे पाकिस्तानविरुद्ध विराटचा चांगला रेकॉर्ड आहे. त्यामुळे विराट साठी एक मोठी संधी असणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...

Mahesh Manjrekar : 'यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा...'; आज समजणार 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यानंतर महायुतीचे नेते गोंधळलेले; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना टोला

Devendra Fadanvis Podcast : 'एक नवी सुरुवात करतोय...'; मुख्यमंत्री पॉडकास्टच्या माध्यमातून साधणार संवाद, पंढरपुरातून केली घोषणा