व्हिडिओ

Vitthal Rukmini Mandir : Pandharpur : नववर्षानिमित्त सजला विठुरायाचा गाभारा

Published by : Team Lokshahi

नववर्षाच्या स्वागताला पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी विविध प्रकारच्या पानांची, फुलांची आणि फळांची सजावट करण्यात आली आहे. आळंदी येथील भाविक प्रदीप ठाकूर यांनी ही सेवा देवाच्या चरणी अर्पण केली आहे. नवीन वर्षाची सुरवात विठुरायाच्या दर्शनाने करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दाखल झाले आहेत. पुण्यातील प्रदीप ठाकूर पाटील या भक्ताने ही सजावट केली आहे. या सजावटीमुळे विठुरायाचे सावळे रूप अधिकच खुलून दिसत आहे. रविवारी पहाटेपासूनच भाविकांनी रांगा लावत विठुरायाचे दर्शन घेतले. यावेळी विठ्ठल-रुक्मिणीच्या नाम-गजराने परिसर दुमदुमून गेला होता.

PBKS VS RR: पंजाब किंग्जने राजस्थान रॉयल्सचा 5 गडी राखून केला पराभव

Yavatmal : यवतमाळमध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ? शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या

Navi Mumbai : नवी मुंबईत अनधिकृत होर्डिंगवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई

Monsoon News : केरळमध्ये 31 मे ला मान्सून दाखल होणार,हवामान विभागाचा अंदाज

Amit Shah On Kejriwal : 'केजरीवालांना जामिनाबाबत विशेष वागणूक' अमित शाहांचा मोठा दावा