प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या १ लाख ७२ हजार स्वयंपाकी व मदतनीसांच्या प्रलंबित मागण्यांवर तोडगा न निघाल्याने आयटकतर्फे १० डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर बेमुदत मुक्कामी महामोर्चा काढण्यात येणार आहे. मानधनवाढ, किमान वेतन व सामाजिक सुरक्षा योजनांची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
२५०० रुपयांच्या तुटपुंज्या मानधनात अनेक वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीची घोषणा अद्याप राबवली नसल्याचा आरोप करत किमान २६ हजार वेतन, सामाजिक सुरक्षा, १२ महिन्यांचे मानधन व दिवाळी बोनस आदी प्रमुख मागण्यांवर हा मोर्चा होणार असल्याची माहिती आयटकचे राज्य उपाध्यक्ष दिलीप उटाणे यांनी दिली.
१ लाख ७२ हजार पोषण आहार कर्मचाऱ्यांचा नागपूर अधिवेशनावर मोर्चा
मानधनवाढ, किमान २६ हजार वेतन आणि सामाजिक सुरक्षेची मागणी
२५०० रुपयांच्या तुटपुंज्या मानधनावर अनेक वर्षे कामाचा आरोप
आयटकचे उपाध्यक्ष दिलीप उटाणे यांनी बेमुदत आंदोलनाची घोषणा केली