व्हिडिओ

CM Devendra Fadnavis : '2026 पर्यंत शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार',फडणवीसांचं आश्वासन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस: 2026 पर्यंत शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार, वीज बिल कमी होणार

Published by : Prachi Nate

वर्ध्यात विविध विकासकामांचं लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमात भाषण करताना आर्वीचे आमदार सुमित वानखेडे यांनी विविध मागण्या केल्या. तसेच, मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळत शेरोशायरी देखील केल्याचं पाहायला मिळालं. त्याचसोबत शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज देऊ' असं आश्वासन वर्ध्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे. त्याचसोबत '2026 पर्यंत शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार' तसेच दरवर्षी विजेचं बिल कमी होणार असं देखील मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "समृद्धी महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्ग या दोन महामार्ग मुळे एक प्रकारे सेंट्रल इंडियाच लॉजिस्टिक सेंट्रल हे आपल्या वर्धा जिल्हा या ठिकाणी होतो आहे. जलसमृद्ध राज्य होते, तिथे आता दुष्काळ पडला आहे. पाणी जास्तीत जास्त मुरेल असे प्रयत्न करा".

"शेतकऱ्यांचं विजेचा बिल कमी केलं आहे. लोअर वर्धा प्रकल्पावर 500 मॅगाव्हॉल्ट सोलरची निर्मिती करत आहे, यामुळे वीजही स्वतः मिळणार पाण्याचे बाष्पीभवन होते ते ही कमी होणार. आता घरकुल लाभार्थ्यांना दोन लाख देणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच पंतप्रधान आवास योजनेतील प्रत्येक घरावर सोलर लागेल पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांना वीज बिल भराव लागणार नाही त्यांना मोफत वीज मिळेल".

"विदर्भाचा कायापालट करणारा प्रकल्प म्हणजे वैनगंगा, नळगंगा प्रकल्प. या प्रकल्पात 550 मीटर नदी तयार करणार आहे. नागपूर वर्धा,अमरावती, अकोला,बुलढाणा,वाशीम या जिल्ह्याला पाणी मिळणार आहे या जिल्ह्याचा दुष्काळ कायमचा संपवणार आहे. वर्धा जिल्ह्यासह अनेक जिल्हे सुजलाम सुफलाम होणार आहे", असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी