व्हिडिओ

Amaravati |पावसाने घेतला 'इतक्या' जणांचा जीव

पश्चिम विदर्भात चार दिवसात अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे मोठा हाहाकार माजवला

Published by : Team Lokshahi

अमरावती: पश्चिम विदर्भात १८ जुलै ते २२ जुलै या चार दिवसात अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे मोठा हाहाकार माजवला आहे. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाने नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्याचा प्राथमिक अहवाल जाहीर केला आहे.

*अमरावती जिल्हा

शेती नुकसान ४४५७२,३५ हेक्टर

६ लोकांचा मृत्यू, जनावरे मृत्यू १०४

*यवतमाळ जिल्हा

शेती नुकसान ८१३८६.०० हेक्टर

९ लोकांचा मृत्यू, जनावरे ७६मृत्यू

*अकोला जिल्हा

शेती नुकसान ९२४२०.०० हेक्टर

३ मृत्यू लोकांचा, जनावरे मृत्यू २३

*बुलढाणा जिल्हा

शेती नुकसान ७६८९९.००हेक्टर

६ लोकांचा मृत्यू, जनावरे २३८ मृत्यू

*वाशिम जिल्हा

शेती नुकसान ३९६१०.५हेक्टर

५ लोकांचा मृत्यू, जनावरे मृत्यू ३०

*एकूण पाच जिल्ह्यात

१० हजार ३८० घरांची पडझड

चार दिवसात पाच जिल्ह्यात सरासरी पडलेला पाऊस १४५.९ मीमी.

या चार दिवसात तब्बल वीज पडून, पुरात वाहून व भिंत कोसळून २९ नागरिकांचा मृत्यू झाला. तर ३ लाख ४८८७.८५ हेक्टरवर शेती पिकांचे नुकसान झाले आहेत. तर १०३८० घरांची पडझड झाली आहे, तर पुरात अडकलेल्या १६५८ कुटुंबातील ५१५६ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. तर धक्कादायक म्हणजे १ लाख ७१ हजार २८ हेक्टर शेत जमीन पूर्णपणे खरडून निघाली असल्याने, दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे.

हा प्राथमिक अहवाल आहे. यात शेतकरी पार खचला असून, राज्यात सर्वाधिक आत्महत्याग्रस्त पश्चिम विदर्भात आहेत. त्यामुळे विशेष पॅकेज या पश्चिम विदर्भासाठी जाहीर करण्यात यावं, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा