उद्धव ठाकरेंनी सुरू केलेली शिवभोजन थाळी योजना बंद होणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांत उठत असतात. अशातच नेमकं अन्न व नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी असणार खात मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे आलं आहे. त्यामुळे याबाबतचा प्रश्न छगन भुजबळांनाच विचारणं हे महत्त्वाचं ठरलेल आहे. याचपार्श्वभूमीवर लोकशाही मराठीने मंत्री छगन भुजबळांना शिवभोजन थाळी बंद होणार का? असं थेटच विचारलं. त्यावर उत्तर देताना शिवभोजन थाळी कधीही बंद होणार नाही, असं स्पष्ट उत्तर छगन भुजबळांनी दिलं आहे.