व्हिडिओ

म्हशीला कळलं ते माणसांना कधी कळणार? लाल सिग्नल पाहून थांबली अन्...;

Published by : Team Lokshahi

वाहतुकीच्या नियमांचे पालन करा असे आवाहन नागरिकांना अनेकदा वाहतूक पोलिसांकडून करण्यात येते. मात्र तरीही अनेक वाहनचालक सर्रास नियमांचे उल्लंघन करताना दिसून येतात. विरारच्या रस्त्यावरून चालणारी एक म्हैस चक्क याद अपवाद ठरली आहे. विरार पूर्वेच्या आर जे नाका या चार रस्त्यावरून चालणाऱ्या एका म्हैशीला रस्ता ओलांडायचा होता. मात्र सिग्नल लाल असल्याने ही म्हैस सिग्नल वर थांबली होती..तेव्हा तिच्या बाजूने अनेक वाहनचालक सिग्नल तोडून जाताना दिसलें. मात्र जेव्हा सिग्नल हिरवा झाला तेव्हा या म्हशीनें आजू बाजूच्या वाहणांना न बघता रस्ता ओलांडला. या म्हशीसाठी सिग्नल तोडणाऱ्या एका बसलाही थांबावे लागले.

लोकशाहीच्या कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला आहे. माणसांच्या तुलनेत आता प्राणी वाहतूक नियमांचे पालन करत असल्याच्या प्रकारावरून आश्चर्य व्यक्त केले जातं आहे.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी मृतांचा आकडा वाढला; 17जणांचा मृत्यू

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेची SIT चौकशी होणार

राज्यात पुढील पाच दिवस काही भागात उष्णतेच्या लाटा

दहावीच्या परीक्षेचा निकाल 'या' दिवशी होणार जाहीर

...म्हणून मी पहाटे पोलीस ठाण्यात गेलो होतो; सुनील टिंगरे यांचे स्पष्टीकरण