लोकार्पणच्या वादात अडकलेली नवी मुंबई मेट्रो अखेर आजपासून नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. बहुप्रतीक्षित नवी मुंबई मेट्रो-1 आज, शुक्रवारी उद्घाटनाशिवाय सुरू होणार आहे. मेट्रोची पहिली फेरी दुपारी 3 वाजता पेंधर ते बेलापूर अशी असणार आहे. रात्री 10 वाजता शेवटची फेरी असेल. 11 किलोमीटर मार्गावर 11 स्थानके आहेत. तिकीटदर 10 रुपये ते 40 रुपये असणार आहे.
नवी मुंबई मेट्रोचे संपूर्ण वेळापत्रक लोकशाही मराठीच्या हाती
असे असतील तिकीट दर