मराठा आरक्षणासाठी सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी आज सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. सह्याद्रीवर 10.30 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत आरक्षणाबाबत विविध पक्षांची मतं जाणून घेतली जाणार आहेत. रात्री वर्षावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत सर्वपक्षीय बैठकीत काय मुद्दे मांडायचे याबाबत चर्चा झाली. आरक्षणासाठी सरकार स्पेशल अधिवेशन घेतलं जाणार नाही. सरकार कायद्यानेच आपली बाजू सुप्रीम कोर्टात मांडणार आहे.