व्हिडिओ

Vaibhav Naik : ठाकरे गटाचे वैभव नाईक भाजपच्या गळाला? वैभव नाईकांची प्रतिक्रिया

Published by : Team Lokshahi

ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी घेतली मंत्री रविंद्र चव्हाण यांची भेट झाली. नाईक व चव्हाण बंद दाराआड भेटीनंतर चर्चांना उधाण आले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार वैभव नाईक यांची गुप्त भेट झाल्यानं सिंधुदुर्गात चर्चा रंगल्या आहेत.

कणकवली रेस्ट हाऊसमध्ये ही भेट झाली होती. यावर रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली की, कुणाला पक्षात घ्यायचं असेल तरी देखील भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे यांना विश्वासात घेऊनच पुढची पावले टाकली जातात. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विचारल्याशिवाय किंबहुना त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलीही गोष्ट आम्ही करत नाही.

यावर आता वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे की,

गेल्या 2 वर्षांपासून आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत आहोत. त्यामुळंच आमच्यावर अनेक कारवाई चालू आहेत. 4 दिवसांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा सिंधुदुर्ग दौरा झाला त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. खर तर काल आम्ही शासकीय अधिकाऱ्यांच्या समोर रविंद्र चव्हाण यांचं नियोजित दौरा शासकीय विश्रामगृहावर त्यांना निवेदन दिलं. त्यांनी आम्हाला काही बदल सूचवण्यासाठी थांबवलं आणि ते जिल्हयाचे पालकमंत्री आहेत म्हणून भेटलो. ज्या लोकांना भिती आणि आमिष देऊन सुद्धा येत नाही त्यांचं असं नाव खराब करायचा प्रयत्न करतात. आम्ही पक्ष सोडून आजही जात नाही, उद्याही नाही आणि परवाही जाणार नाही, असं वैभव नाईक म्हणाले.

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार