रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद दिल्ली दौऱ्यावरून आल्यावर मिटवतील असा दावा मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे. रायगड पालकमंत्री पदाबाबत २ दिवसात निर्णय होणार, असं मंत्री भरत गोगावले यांनी वक्तव्य केल आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे तीन आमदार मंत्रालयात पोहचले आहेत.
रायगड जिल्हा पालकमंत्री पदाचा वाद सुरू असतानाच रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे तीन ही आमदार मंत्री भरत गोगावले यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात पोहचले आहेत. शिवसेना आमदार महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी आणि रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले मंत्रालयात दाखल झालेत. तसेच शिवसेना व राष्ट्रवादी वादावर पडदा पडण्याची शक्यता देखील वर्तावली जात आहे.