स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या यांच्या काही मालमत्ता प्राप्तिकर विभागाकडून जप्त करण्यात आल्या असून त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्या डायरीत ‘मातोश्री’ला दोन कोटी रुपये आणि ५० लाख रुपयांचे घड्याळ दिल्याची नोंद असल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. या व्हिडिओमध्ये आम्ही शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्याबद्दलच्या त्या डायरी वादाचा उलगडा केला आहे. त्या डायरीत 'मातोश्री' असे नाव असून भाजप नेते हे नाव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाशी जोडत आहेत.