यवतमाळ: यवतमाळ महागाव तालुक्यातील गुंज येथील महावितरणच्या उपकेंद्राला अचानक आग लागली. यामध्ये महावितरण कंपनीचे लाखो रुपयांचे साहित्य घेऊन खाक झाले आहे. आग इतकी भीषण होती की जवळपास शंभर फुटावर धुराचे लोड दिसत होते.
दरम्यान या घटनेची माहिती पुसदच्या अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आहे. नेमकी ही आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही आहे. त्यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही.