सतीश वाघ खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून आणखी दोन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांनीच सतीश वाघ यांचे अपहरण केलं. ज्या गाडीत वाघ यांचे अपहरण केले होते त्या गाडीत आणखी दोन जणं आधीपासूनच होते, अशीही माहिती समोर आली आहे. या चारही आरोपींनी वाघ यांचा गाडीतच खून केल्याची माहिती समोर आली आहे.