व्हिडिओ

संकल्प केला तेथेच मंदिर बांधलंय; अयोध्येत योगींचं विधान

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अयोध्या : राममंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली आहे. यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिराचे राष्ट्रीय मंदिर असे वर्णन करून ते म्हणाले, श्री रामजन्मभूमी ही जगातील पहिलीच अशी अनोखी घटना असेल ज्यात एखाद्या राष्ट्रातील बहुसंख्य समाजाने त्यांच्या जन्मभूमीवर मंदिर उभारणीसाठी इतकी वर्षे संघर्ष केला असेल. श्री रामजन्मभूमी मंदिराची स्थापना भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचे प्रतीक आहे.

ज्या ठिकाणी मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले होते तेथेच मंदिर बांधले आहे, याचे आम्हाला समाधान आहे. 500 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आलेल्या भगवान श्री राम लल्ला यांच्या प्रतिमेच्या अभिषेकच्या ऐतिहासिक आणि अत्यंत पवित्र प्रसंगी आज संपूर्ण भारत भावनांनी भरलेला आहे, असे योगी आदित्यनाथांनी म्हंटले आहे.

IPL 2024 : हैदराबाद आणि गुजरातचा सामना रद्द; काय आहे प्ले ऑफचं समीकरण? 'हा' संघ मारणार बाजी

"छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल, तर..."; अमोल कोल्हेंनी भाजपवर डागली तोफ

देश तोडण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला अमित शहांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "भारताचं विभाजन..."

Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...