(Zeeshan Siddique ) माजी आमदार झिशान सिद्दीकींचा अनोळखी व्यक्तीकडून पाठलाग करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पाठलाग करतानाचा सीसीटीव्ही समोर आला असून एक तरुण दिवसभर झिशान सिद्दीकींचा पाठलाग करत होता अशी माहिती मिळत आहे.
या प्रकरणी आता वांद्रेतील निर्मल नगर पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं असून याच पार्श्वभूमीवर आता झिशान सिद्दीकींच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
काल सकाळपासून झिशान सिद्दीकी यांचा ही व्यक्ती पाठलाग करत होती. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आणि आता या प्रकरणाचा पोलीस अधिकचा तपास करत आहे.