नोएडामधून एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका डेकेअरमधील महिला कर्मचारी 15 महिन्यांच्या चिमुकल्याला मारहाण करत चावत असल्याचे पाहायला मिळाले आहे. चिमुकल्याला खाली पाडत असून त्याला जोराने मारहाण करत असल्याचे दिसत आहे. आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.