सध्या राज्यभरात पावसाचा हाहा:कार पाहायला मिळत आहे. अशातच सातारा जिल्ह्यातील माण तालुका येथील कुळकजाई गावात मुसळधार पावसाच्या जोरामुळे रस्त्याचं अक्षरशः चिखल झालं आहे. पावसामुळे रस्त्याची झालेली दैना पाहून एका युवकाला चक्क आपली दुचाकी खांद्यावर घेऊन बाहुबली स्टंट करत रस्ता पार करावा लागला आहे.
साताऱ्यातील माण येथील गावात पावसाळ्यात रस्त्यांची होणारी दुर्दशा पाहून तेथिल नागरिकांना वाहने चालवणे अशक्य ठरते आहे. त्यात दुचाकी चालवणारे नागरिक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत असल्याची दृष्य पाहायला मिळत आहेत. यामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.