व्हायरल

Scorpion: थायलंडमध्ये सापडला आठ डोळे आणि आठ पाय असलेला विंचू; पाहा फोटो

जेव्हा संशोधक टेनासेरिम पर्वतरांगेजवळ तळ ठोकून होते तेव्हा त्यांना एका खडका खाली लपलेला नवीन प्रजातीचा विंचू आढळला.

Published by : Sakshi Patil

थायलंडच्या कएन्ग क्रछन् नॅशनल पार्कमध्ये (Kaeng Krachan National Park) वन्यजीव मोहिमेदरम्यान, संशोधकांच्या संघाने एक अनोखा शोध लावला आहे. जेव्हा संशोधक टेनासेरिम पर्वतरांगेजवळ तळ ठोकून होते तेव्हा त्यांना एका खडका खाली लपलेला नवीन प्रजातीचा विंचू आढळला.

याचा शोध घेतल्यानंतर त्यांनी तीन प्रौढ नर आणि एका प्रौढ मादीचा अभ्यास केला. ही नवीन प्रजाती युस्कोपाअ‍ॅप्स (Euscopiops) या उपजिनसची आहे आणि शोध लागलेलं ठिकाण थायलंडमधील राष्ट्रीय उद्यानाच्या नावावरून तिचे नाव युस्कोपाअ‍ॅप्स क्रछन् (Euscorpiops Krachan) असे ठेवण्यात आले आहे.

अभ्यासानुसार, नवीन प्रजाती युस्कोपाअ‍ॅप्स क्रछन् (Euscorpiops Krachan) हे इतर प्रजातींच्या तुलनेत खूपच लहान आहेत. हे विंचू तपकिरी रंगाचे असून मादी नरांपेक्षा गडद रंगाच्या आहेत. या नवीन प्रजातीच्या विंचूंना आठ डोळे आणि आठ पाय आहेत. स्कॉर्पिओप्स वंशातील इतर विंचू हल्ला करून शिकार करतात किंवा शिकारची बसून प्रतीक्षा करतात आणि मग हल्ला करतात. या नवीन प्रजातीचे विंचू सुद्धा शिकार करताना समान रणनीती वापरतात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?