भूपेश बारंगे : नागपूर तुळजापूर मार्गावर वर्ध्यातील सेलसुरा नजीकच्या पुलात कार कोसळून 7 वैद्यकीय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अपघातने शहरासह जिल्ह्यात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते .या अपघातापूर्वीचा व्हिडीओ सहा दिवसानंतर आता व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. या व्हिडिओची लोकशाही कसल्याही प्रकारची पुष्टी करत नाही.
शुभम जयस्वाल यांच्या स्नॅपचाटच्या आयडीवर हा व्हिडीओ अपलोड झालेला दिसत आहे.अपघातापूर्वी एका काळ्या रंगांच्या फॉरचूनर कारच्या समोर जाण्याचा प्रयत्न करत आहे यावरून या गाडीचा किती वेग असेल हा अंदाज व्यक्त केला जात आहे. सेलसुरा येथील पुलाच्या नदीत कोसळलेल्या कारच्या अपघातात 7 विद्यार्थ्यांचा मुत्यू झाल्याने वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात होते. पवन शक्ती यांच्या वाढदिवसानिमित्त देवळी तालुक्यातील इसापूर जवळील एका हॉटेल मध्ये जेवण करायला गेले होते त्याचा सीसीटीव्ही समोर आला होता. आता आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
अरे आराम से… आराम से… सर…
सहा दिवसानंतर व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक मित्र कारचा वेग बघता 'अरे आरामसे आरामसे सर… असे बोलताना दिसत आहे.यावेळी कार मध्ये मोठ्या आवाजात गाणे चालू असल्याचे दिसत आहे.एका काळ्या रंगांच्या फॉरचूनर कारच्या समोर जाण्यासाठी कारचा भरधाव वेग असल्याची चर्चा आहे.
हा व्हिडीओ परत येतानाचा असल्याची चर्चा
देवळी तालुक्यातील इसापूर येथील हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर परत येताना नागपूर तुळजापूर मार्गावरील गाडी चालवितानाचा व्हिडीओ व्हायरल होतं आहे. हा व्हिडीओ अपघातपूर्वीचा असल्याचे बोलले जात आहे.सहाव्या दिवशी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.