आज काल अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. पण त्यातही काही व्हिडिओ आपल्या काळजाचा ठाव घेतात. त्या व्हिडिओंना आपण सारखं बघत राहतो. असाच एका सतत बघावा असं वाटणारा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओत एक हत्ती धडपडतोय. कशासाठी? तुम्हीच पाहा या हत्तीची मजा
या व्हिडीओत एक हत्ती खड्ड्यात अडकलाय . चिखलामुळे त्याला वर येताच येत नव्हतं. अशावेळी अख्ख गाव जमा झालेलं आणि त्या हत्तीला सोडवण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली. आपण या व्हिडिओमध्ये पाहु शकता कीही माणसं हत्तीला सोडवण्यासाठी अनेक ,प्रयत्न करत आहेत. कोणी दोऱ्यांच्या साह्याय्याने या निष्पाप जीवाला बाहेर काढण्यासाठी धडपड करतंय तर कुणी काठीच्या साह्याने त्याला वर उचलतंय.
तो पुन्हा खड्ड्यात पडून चिखलात रुतु नये म्हणून काठीचा आधार देतंय. अखेरीस अथक प्रयत्नांनी तो हत्ती बाहेर येतो. आणि रानाच्या दिशेने पळू लागतो. पण या हत्तीला बाहेर काढल्यावर गावकऱ्यांचा जो आनंद आहे तो शब्दातीत आहे. या व्हिडिओत हत्ती बाहेर निघाल्यावर आजूबाजूच्या लोकांचा जल्लोष तुम्ही ऐकू शकता.