सचिन बडे | छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे नाव घ्यायचं आणि आपली राजकीय पोळी कशी भाजता येईल हे सर्वानी पाहिले आहेच. हा आता राजकिय धंदाच झाला आहे. मात्र तुमच्या पेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर आम्ही जास्त करतो, हे भाजप शिवसेनेला सांगतो. कारण त्यांच्या नावाचा वापर मी राजकीय स्वार्थासाठी करत नाही, असे म्हणत इम्तियाज जलील (Imtiyaz Zalil) यांनी भाजप-सेनेला लक्ष केले आहे.
इम्तियाज जलील (Imtiyaz Zalil) पुढे म्हणाले, औरंगजेबच्या कबरीसमोर आम्ही नतमस्तक होतो, असं काही नाही आहे. औरंगजेब इतिहासातले एक पात्र होते. औरंगजेब होते याचा अर्थ असा होत नाही की सगळे मुसलमान जाऊन नतमस्तक होतात आणि गु़डघे टेकतात.तुम्ही दाखवाना आम्हाला अस काही असेल तर असे आव्हानच जलील (Imtiyaz Zalil) यांनी दिली आहे.
भाजपाला सत्तेपासून दुर ठेवण्याचा प्रयत्न
हा काही कट नाही, तसेच आम्ही कोणाच्याही बोलण्यावरून हे करत नाही आहोत. आमचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. या देशाला आणि राज्याला वाचवण्यासाठी आपल्याला भाजपला सत्तेपासून दुर ठेवावे लागेल. त्यामुळे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जे आम्हाला करता येईल ते आम्ही करू असे जलील (Imtiyaz Zalil) म्हणालेत. मी मुख्यमंत्र्यांना भेटणार,भेटून बसून चर्चा करणार,तुम्ही बसून तर चर्चा करा असेही जलील (Imtiyaz Zalil) म्हणाले.