कोकण व घाटमाथ्यावरील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून, रायगड, रत्नागिरी व पुणे घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात काही भागांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता असल्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
त्याचसोबत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात काही भागात काल तुरळक पाऊस झाला. आजही सकाळपासून ढगाळ वातावरण असून जिल्ह्यात सह्याद्रीच्या काही भागात जोरदार पाऊस होऊ शकतो. हवामान खात्याने 25 जून पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात येलो अलर्ट दिला आहे.