थोडक्यात
ओडिशात चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत
अनेक भागांत भूस्खलन, महामार्गावरील पूल पाण्याखाली
ओडिशा आणि आंध्र प्रदेशदरम्यान होणारी वाहतूक ठप्प
(Odisha Weather Update ) मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत आहे. ओडिशात चक्रीवादळामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक भागात भूस्खलन झाले असून महामार्गावरील पूल पाण्याखाली गेला आहे.
ओडिशा आणि आंध्र प्रदेश दरम्यान होणारी वाहतूक ठप्प झाली आहे. मुसळधार पावसामुळे तसेच चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून ओडिशाच्या किनारपट्टीवरील सात जिल्ह्यांत रेड अलर्ट, तर 16 जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ओडिशाच्या किनारपट्टीजवळ जोरदार पाऊस पडत असून अनेक भागांत भूस्खलन होऊन ठिकठिकाणी झाडं पडण्याची घटना देखील घडल्या आहेत. काही भागात पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळत आहे.