थोडक्यात
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस
राज्यात नुकत्याच पडलेल्या पावसानं काढणीला आलेलं पिकाचं नुकसान
पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची बळीराजाची मागणी
(Farmers Loss Due To Rain) राज्यात पावसाने विश्रांती घेतली असतानाच उकाड्याचा जोर वाढला असतानाच पुन्हा एकदा काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरूवात झालेली पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असून महाराष्ट्रावर पुन्हा अवकाळी संकट आहे.
अनेक ठिकाणी शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून अनेक शेतशिवाऱ्यात पाणी शिरुन शेतीचे नुकसान झालं आहे. राज्यात नुकत्याच पडलेल्या पावसानं काढणीला आलेलं पिकाचं मोठ्या नुकसान झालं असून लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी बळीराजाकडून करण्यात येत आहे.