Maharashtra Weather Update 
Weather Update

Maharashtra Weather Update : राज्यातील 'या' भागात आज जोरदार पावसाची शक्यता

राज्यात 30 सप्टेंबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • राज्यातील आज जोरदार पावसाची शक्यता

  • अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण

  • राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा

(Maharashtra Weather Update ) मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही दिवसांपासून ढगाळ वातावरणासह पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत.

राज्यात ३० सप्टेंबरपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला असून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे पुराच्या धोक्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सतर्क रहावे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह सुरू असलेला मुसळधार पाऊस असाच सुरू राहिल्यास राज्यातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. आज देखील हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

ठाणे आणि मुंबई उपनगरात पावसाची रिपरिप अजूनही सुरूच असल्याचे पाहायला मिळत असून मंगळवारपासून पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रायगड, नाशिक, पुण्यात जोरदार पावसाची शक्यता असून पुण्यातील धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताने पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली 'ही' पोस्ट

Team India Asia Cup 2025 Final : आशिया कपवर भारताची मोहर! नकवींच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास टीम इंडियाचा नकार

Ujjani Dam : उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस; चंद्रभागेच्या वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्याखाली

Sina River : मुसळधार पावसामुळे सीना नदीला पुन्हा एकदा महापूर; अनेक गावात शिरलं पाणी