थोडक्यात
काही दिवसांपासून ढगाळ वातावरणासह पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत
पुढील चार ते पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज
40 ते 50 किमी गतीने वारे वाहतील
( Vidarbha Rain Update ) राज्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणासह पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत.अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अतिवृष्टी, ढगफुटी आणि पुराने मराठवाडा, विदर्भातील नागरिक हैराण झाले आहेत. मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
यातच आता विदर्भात आजपासून पुढील चार ते पाच दिवस सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. 40 ते 50 किमी गतीने वारे वाहतील असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
आज विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून बाकी सर्व जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवस ढगाळी वातावरण राहील आणि तीव्र ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.