थोडक्यात
राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार
महाराष्ट्रात आणि कोकण किनारपट्टीवर पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अनेक भागात मुसळधार पाऊस
(Weather Update ) काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. राज्यात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. यातच आता पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पुढील दोन दिवसांत ते पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकण्याची शक्यता असून याच स्थितीमुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि उत्तर कोकणात जोरदार पाऊस होईल.
आजपासून मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल. त्यामुळे मुंबई, रायगड, रत्नागिरीसह ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल, असा इशारा देण्यात आला आहे.