Maharashtra Weather Update 
Weather Update

Maharashtra Weather Update : आज राज्याच्या 'या' भागात मुसळधार पावसाचा अंदाज

जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • आज कोकण तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

  • जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता

  • मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्याला हलक्या सरी बरसण्याची शक्यता

(Maharashtra Weather Update ) राज्यात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकऱ्यांच्या पीकांचे अतोनात नुकसान झालं. काही ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ झाली आहे.

पावसाचा जोर राज्यात गेल्या काही दिवसांपासून कमी झाल्याने अनेकांना दिलासा मिळाला होता. ऐन दिवाळीत पावसाच्या सरी कोसळणार असण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.अनेक भागांत दमट वातावरणामुळे नागरिक हैराण झाले. यातच आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे.

राज्यात ठिकठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. यातच आज कोकण तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून काही ठिकाणी विजा आणि जोरदार वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यामुळे लक्षद्वीप , केरळ, दक्षिण कर्नाटकच्या किनाऱ्यालगत रविवारपर्यंत पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यासोबतच मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्याला हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा