Beed School  
Weather Update

Beed School : पावसाचा कहर; बीडमधील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी, जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांना महापूर

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

  • बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांना महापूर

  • बीडमधील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

( Beed School ) राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागा आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

सरकारने तात्काळ पंचनामे करवे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. बीडच्या नांदूर हवेली गावात 36 लोक पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती मिळत असून पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी NDRF ची एक टीम दाखल झाली आहे.

याच मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांना महापूर आला आहे तर अनेक पुलावरून पाणी वाहत असल्याचे पाहावयास मिळत आहे, त्याचबरोबर अजूनही हवामान खात्याने पावसाचा अंदाज सांगितला आहे. याच पार्श्वभूमीव बीड जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून बीड जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी करण्यात आले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Marathwada Rain Update : मराठवाड्यासाठी 3 दिवस अत्यंत महत्वाचे; 'या' तारखांना जोरदार पाऊस बरसणार

Sanjay Raut : धनंजय मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनाच्या चर्चांवर , राऊतांचा मोठा खुलासा

तुरीच्या शेंगाची आमटी; आरोग्यासाठी आहे फायदेशीर, जाणून घ्या

Dattatraya Bharane : शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार! दत्तात्रय भरणे यांची दिलासादायक घोषणा