Anushka Sharma Team Lokshahi
वेब स्टोरीज

Anushka Sharma :अनुष्काने नकारलेल्या या चित्रपटांमुळे दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट झाल्या हीट

अनुष्काला तिच्या चांगल्या अभिनयामुळे अनेक चित्रपटे आली पण जे तिने नकारले आणि ते चित्रपट भविष्यात खूप हिट ठरले.

Published by : shweta walge

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ही एक सुंदर अभिनेत्री आहे. 2008 मध्ये तिने 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटामधून करिअरची सुरुवात केली होती. हा चित्रपट जबरदस्त हिट ठरला आणि अनुष्काला चांगलीच प्रसिध्दि मिळाली. यानंतर तिने 'बॅड बाजा बारात', 'जब तक है जान' यासारखे हिट चित्रपटही केले.

अनुष्काला तिच्या चांगल्या अभिनयामुळे अनेक चित्रपटे आली पण जे तिने नकारले आणि ते चित्रपट भविष्यात खूप हिट ठरले, किंवा त्या चित्रपटांची खूप प्रशंसा झाली.

3 इडियट्स (3 idiots) : राजकुमार हिरानी दिग्दर्शित आमिर खान, आर.के. माधवन आणि शर्मन जोशी यांच्या या चित्रपटात करीना कपूरच्या (Kareena Kapoor) भूमिकेसाठी आधी अनुष्काची निवड करण्यात आली होती. पण, अनुष्का शर्माने हा चित्रपट करण्यास नकार दिल्याने करीना कपूरला कास्ट करण्यात आले. यानंतर 3 इडियट्स खूप हिट झाला.

2 स्टेट्स (2 States): आलिया भट्ट आणि अर्जून कपूरचा '2 स्टेट्स' हा चित्रपट ब्लॉकबस्टर चित्रपट होता. ज्याने आलिया भट्टला (Alia Bhatt) स्टार बनवले. अनुष्का शर्माला या चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली नाही आणि आलिया भट्टला हा चित्रपट मिळाला.

तमाशा (Tamasha) : इम्तियाज अलीचा रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) स्टारर तमाशा हा चित्रपट अगोदर अनुष्का शर्माला ऑफर करण्यात आला होता. पण, अनुष्का शर्माला ताराचे पात्र आवडले नाही आणि दीपिका पदुकोणनला कास्ट करण्यात आले.

बार बार देखो : सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कतरिना कैफचा (Katrina Kaif) हा चित्रपट अगोदर अनुष्का शर्माला मिळाला होता, पण काही कारणांमुळे अनुष्का हा चित्रपट करू शकली नाही. नंतर कतरिना कैफला या चित्रपटात घेण्यात आले.

अनुष्का शर्मा चार वर्षांनंतर 'चकडा एक्सप्रेस'(Chakda Express) मधून परत पडद्यावर परतणार आहे. या चित्रपटात ती महिला क्रिकेटर झुलन गोस्वामीची (Jhulan Goswami) भूमिका साकारणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जास्त नाटकं केल्यास कानाखाली आवाज काढलाच पाहिजे - राज ठाकरे

Latest Marathi News Update live : व्यावसायिक सुशील केडियाने मागितली माफी

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक