वेब स्टोरीज

BhauBeej 2023 : भाऊबीजेला भावाला द्या 'या' खास भेटवस्तू

लाडक्या भावाला तुम्ही एकापेक्षा एक भारी गिफ्ट देऊ शकता. त्यातील निवडक गिफ्ट जाणून घ्या. x

Published by : Team Lokshahi

दिवाळीचे पाचही दिवसाचे वेगवेगळे महत्त्व आहे. दिवाळीच्या पाचव्या दिवशी भाऊबीज असते. बहीण भावाच्या नात्याचे बंध जोपासणारा असा हा सण. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. हा दिवाळीतील भाऊ बहिणींचा साजरा केला जाणारा दिवस आहे.

या खास दिवशी बहिण भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि त्याला ओवाळते तर भाऊ बहिणीला आशीर्वाद आणि प्रेम म्हणून छान भेटवस्तू देतो. तसे तुम्हालाही या वर्षी भावाला काय गिफ्ट द्यावं, असा प्रश्न पडला का? मग हे वाचाच.

बहिणीचं नातं भावासाठी नेहमीच मोठं आणि महत्त्वाचं असतं. त्यामुळे लाडक्या भावाला भेट देताना त्याच्या आवडीनिवडीचा विचार करा. त्याला अशी भेटवस्तू द्या ज्यामुळे त्याला आनंद होईल. शिवाय ती त्याच्या उपयोगाचीपण असेल. त्याला तुम्ही एकापेक्षा एक भारी गिफ्ट देऊ शकता. त्यातील निवडक गिफ्ट जाणून घ्या.

लेदर जॅकेट (Leather Jacket)

मुलांना बाईकवरून फिरताना अथवा ट्रॅव्हल करताना लेदरचं जॅकेट घालायला नक्कीच आवडतं. तुमच्या भावाची ही आवड ओळखून तुम्ही यंदा ही भेट देऊन चकित करू शकता. या जॅकेटमध्ये त्याचा लुकदेखील परफेक्ट दिसेल.

डिजिटल वॉच (Digital Watch)

आजकाल सर्वांनाच स्वतःच ग्रूमिंग करायला आवडत असतं. त्यामुळे मुलींप्रमाणे मुलांनादेखील सौंदर्यप्रसाधनांची आवड असते. जर तुमच्या भावाला बिअर्ड लुकमध्ये इंटरेस्ट असेल तर त्याला हे गिफ्ट जरूर द्या. ज्यामुळे त्याच्या दाढी आणि मिशीचे केस लवकर वाढू शकतील.

ग्रूमिंग किट (Grooming Kit)

पुरूषांनी रूबाबदार दिसावं यासाठी बाजारात अनेक ग्रूमिक किट उपलब्ध असतात. मुलं स्वतःकडे विशेष लक्ष देत नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचं एखादं गिफ्ट त्यांना दिलं तर ते त्यांना नक्कीच आवडतं. शिवाय प्रत्येक बहिणीला आपला भाऊ नेहमीच रूबाबदार दिसावा असं वाटत असतं.

जिम बॅग (Gym Bag)

मुलांना जीमला जाण्याची आवड असते. उत्तम आरोग्यासाठी नियमित जीमला जाण्याची गरज असते. जर तुमचा भावाला जीमला जाण्याची आवड असेल तर त्याला तुम्ही जीम वेअर गिफ्ट देऊ शकता. शिवाय अशा प्रकारची एखादी जीम बॅगदेखील तुम्ही त्याला गिफ्ट देऊ शकता.

सनग्लासेस (Sunglasses)

सनग्लासेस अथवा गॉगल नेहमीच फॅशन म्हणून वापरता येतात. त्यामुळे जर तुमचं भाऊ थोडा ट्रेन्डी असेल तर त्याला सनग्लासेस गिफ्ट द्या. त्याच्या व्यक्तीमत्वानुसार सनग्लासेस निवडले तर तो नक्कीच खुश होईल.

पाकीट (Wallet)

पाकीट ही सर्वांच्याच गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्या भावाला याची गरज ही असणारच. जर तुम्हाला त्याला काहीतरी उपयुक्त भेट द्यायची असेल तर त्याला पाकीटच द्या. लेदरचं पैशांचं पाकीट अथवा वॉलेट कोणालाही आवडू शकतं.

ब्लूटुथ हेडफोन (Bluetooth Headphone)

आजकाल इअर फोनपेक्षा हेडफोनची फॅशन आहे. शिवाय वायरलेस अथवा ब्लूटुथ कनेक्शन असलेले हे हेडफोन प्रवासात सोयीचेदेखील असतात. तुमच्या भावासाठी तुम्हाला एखादं उपयुक्त् गिफ्ट घ्यायचं असेल तर हे गिफ्ट त्याला नक्की द्या. कारण ते त्याला आवडेल आणि त्याचा वापरही होईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा