वेब स्टोरीज

Bollywood Celebs Mysterious Death: 'या' बॉलिवूड कलाकारांचा मृत्यू अजूनही गूढच, कोणालाच कळू शकलं नाही त्यांच...

बॉलिवूडमधील दिव्या भारती, जिया खान, मधुबाला, शकीला, जयश्री रामय्या आणि परवीन बाबी यांच्या रहस्यमय मृत्यूंची कहाणी वाचा. त्यांच्या मृत्यूंच्या कारकिर्दीतील गूढ गोष्टी आणि संशयास्पद परिस्थितींवर एक नजर.

Published by : shweta walge

बॉलिवूडमध्ये १९९० च्या दशकामध्ये दिव्या भारती हिनं तिच्या सौंदर्यानं सर्वांना वेड लावलं होतं. तिने खूप कमी वयातच इंडस्ट्रीत आपलं नाव कमवलं. मात्र दिव्याने वयाच्या19 वर्षी या जगाला निरोप दिला. तिचा मृत्यू पाचव्या मजल्याच्या बाल्कनीवरून पडल्यामुळे झाला होता. तरीही, तिच्या मृत्यूचे कारण आजही एक रहस्य बनून राहिले आहे.

अमिताभ बच्चन यांच्यासोबत निशब्द चित्रपटात दिसलेली जिया खान हिचे वयाच्या २५ व्या वर्षी निधन झाले. जियाने आत्महत्या केली होती. अभिनेत्रीच्या आईला रात्री 11 वाजता जिया लटकलेली दिसली. जियाच्या मृत्यूप्रकरणी आदित्य पांचोलीचे नाव पुढे आले होते.

मधुबाला बॉलीवुडमधील सर्वात सुंदर आणि आकर्षक अभिनेत्रींपैकी एक होत्या, ज्यांनी मुगल-ए-आझम चित्रपटात अनारकलीची भूमिका साकारून प्रत्येकाचं हृदय जिंकलं. मधुबालाचा चित्रपट करिअर अत्यंत यशस्वी होता, पण तिच्या जीवनात अनेक अडचणी आल्या. केवळ 36 वर्षांच्या वयात तिने या जगाचा निरोप घेतला. असं म्हणलं जातं की, दिलीप कुमारसोबतची त्यांची जुदाई आणि सायरा बानोसोबत त्यांच लग्न मधुबालाला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप तोडून टाकणारी ठरली. तिच्या आयुष्यातील या संघर्षांनी तिच्या स्वास्थ्यावरही गंभीर परिणाम केले, आणि त्याचं तिच्या मृत्यूशी संबंधित असण्याचं काही लोकांना वाटतं.

शकीला हे साऊथ इंडस्ट्रीतील एक मोठे नाव आहे. या इंडस्ट्रीतील चित्रपटांमध्ये एकामागून एक बोल्ड सीन देऊन शकीलाने लाखो लोकांना वेड लावले, पण शकीलाचाही संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी दरवाजा तोडून अभिनेत्रीच्या घरात प्रवेश केला तेव्हा तिचा रक्ताने माखलेला मृतदेह बेडवर पडला होता. नाकातून रक्त वाहत होते आणि सर्वत्र उलट्या होत होत्या. त्यांच्या मृत्यूची नेमकी माहितीही मिळू शकली नाही.

प्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेत्री जयश्री रामय्या हीचाही अत्यंत संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. त्याचा मृतदेह बेंगळुरू येथील घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. जयश्री बिग बॉस कन्नडचा भाग राहिली आहे.

परवीन बाबीने बॉलिवूडमध्ये खूप नाव कमावले होते, पण तिच्या शेवटच्या दिवसात परवीनला खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. 20 जानेवारी 2005 रोजी परवीन बाबी तिच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. तिचा मृतदेह तीन दिवस बंद खोलीत पडून होता. पोलिसांनी दरवाजा तोडून अभिनेत्रीचा मृतदेह घरातून बाहेर काढला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर